लखवा झाल्यानंतरही 'लांब नखांचं वेड' काही सुटेना!

उतरत्या वयात लांब नखांमुळे लखवा होण्याची शक्यता बळावेत, हे एका उदाहरणावरून आता स्पष्ट झालंय. कोलकत्याच्या जादवपूरमध्ये राहणाऱ्या 82 वर्षांच्या मुरारी आदित्य यांना लखव्याचा त्रास सहन करावा लागतोय ते त्यांच्या लांब नखांमुळे... पण, तरीही त्यांचं लांब नखांचं वेड त्यांना सोडवत नाहीय. 

Updated: Dec 6, 2014, 05:10 PM IST
लखवा झाल्यानंतरही 'लांब नखांचं वेड' काही सुटेना! title=

कोलकाता : उतरत्या वयात लांब नखांमुळे लखवा होण्याची शक्यता बळावेत, हे एका उदाहरणावरून आता स्पष्ट झालंय. कोलकत्याच्या जादवपूरमध्ये राहणाऱ्या 82 वर्षांच्या मुरारी आदित्य यांना लखव्याचा त्रास सहन करावा लागतोय ते त्यांच्या लांब नखांमुळे... पण, तरीही त्यांचं लांब नखांचं वेड त्यांना सोडवत नाहीय. 

1982 मध्ये 82 वर्षांच्या मुरारी आदित्य यांनी जगात सर्वात लांब नखांचा विश्वविक्रम गिनिज बुकात नोंदवला होता. यावेळी त्यांच्या नखांची लांबी होती तब्बल 182 इंच... काही कारणानं त्यांनी आपली वाढलेली नखं कापावी लागली. यानंतर, पुन्हा कधीही हा रेकॉर्ड आपण तोडू शकणार नाही हे माहीत असूनही त्यांनी 1986 मध्ये त्यांनी पुन्हा नखं वाढवण्यास सुरूवात केली.

त्यांचं हे वेड एवढं वाढलं होतं की या लांब नखांसाठी त्यांनी 80 च्या दशकात आपल्या सरकारी नोकरीवरही पाणी सोडलं होतं. सध्या, 120 इंच लांब नखांच्या (सगळ्या बोटांचे मिळून) भारामुळे त्यांचा डावा हात खूपच सडपातळ आणि लखवाग्रस्त झालाय. पण, आपल्या या लांब नखांनी आपल्याला खूप काही दिलंय... आता त्यांना मी कसं कापू शकतो? असा प्रश्न ते त्यांना नखं कापण्याचा सल्ला देणाऱ्यांना विचारतायत. 

त्यांची सगळी बोटं कडक झालीत आणि बोटं हलवणंही त्यांना कठिण होऊन बसलंय. आपल्या हातांनी ते कोणतंही काम करू शकत नाहीत. त्यांच्या नखांचं वजन जवळपास अर्धा किलो असल्याचा अनुमान काढला गेलाय.

त्यांच्या आजुबाजुच्या परीसरात त्यांना लांबलचक नखांचे काक म्हणून ओळखलं जातं. परंतु त्यांच्या नखांनी त्यांना सध्या खूप त्रास होत आहे. त्यांच्या वाढलेल्या नखांमुळे त्यांना कोणत्याही गोष्टी उचलणे किंवा हालचाल करणे त्यांना शक्य होत नाही. त्या आजोबांनी त्यांच्या नखांना  'रजनी गंधा' असं नाव दिलंय.

आदित्य आजोबा अर्जेंटीना फुटबॉल टीमचे मोठे चाहते आहेत... यामुळेच सध्या त्यांची नख सफेद आणि हिरव्या रंगात रंगलेली दिसतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.