एकट्या मुलाला हेरते ही सुंदर तरुणी नंतर करते मैत्री आणि पुढे...

दिल्ली ते नोएडा येथील हॉटेलमध्ये एकटे बसलेल्या तरुणांना एक सुंदर तरुणी हेरते आणि त्यांच्यासोबत मैत्री जमवते. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसवून अशा ठिकाणी घेऊन जाते की, तुम्ही कधी विचारही करणार नाहीत.

Updated: Apr 26, 2016, 10:11 AM IST
एकट्या मुलाला हेरते ही सुंदर तरुणी नंतर करते मैत्री आणि पुढे... title=

नवी दिल्ली : दिल्ली ते नोएडा येथील हॉटेलमध्ये एकटे बसलेल्या तरुणांना एक सुंदर तरुणी हेरते आणि त्यांच्यासोबत मैत्री जमवते. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये बसवून अशा ठिकाणी घेऊन जाते की, तुम्ही कधी विचारही करणार नाहीत.

ही तरुणी नोएडा येथील ओल्ड एज होममध्ये या तरुणांना घेऊन जाते. ज्या ठिकाणी ज्येष्ठ लोक एकटेपण घालवत असतात. अशावेळी ही तरुणी तरुणांना येथे आणते की त्यांनाही आपले एकटेपणा दूर होण्यास मदत होते. ही तरुणी सामाजिक बांधिलकी जपत असे करीत आहे. याचा एक व्हीडिओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.