नोट बंदीमुळे सेक्स मार्केटवरही सर्जिकल स्ट्राईक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा परिणाम सेक्स मार्केटवरही झालेला आहे.

Updated: Nov 11, 2016, 03:48 PM IST
नोट बंदीमुळे सेक्स मार्केटवरही सर्जिकल स्ट्राईक title=

कोलकाता : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा परिणाम सेक्स मार्केटवरही झालेला आहे. भारतातला सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया अशी ओळख असणारा कोलकत्यामधील सोनागच्ची बाजार पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे ओस पडला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्याचं सांगितल्यानंतर या भागातल्या देहविक्री करणाऱ्या महिलांनी पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारायला नकार दिला. काही महिलांनी तर ऑनलाईन पैसे जमा करायलाही सांगितलं.

सोनागच्चीमध्ये जवळपास 11 ते 20 हजार महिला देहविक्री करतात. यातल्या जवळपास चार हजार महिला अर्ध्या तासाचे तीन हजार रुपये तर उरलेल्या महिला पाचशे रुपये घेतात.