#KisaanVirodhiNarendraModi ट्विटरवर एल्गार

ट्विटरवरही 'किसान विरोधी नरेंद्र मोदी' हा ट्रेंड सर्वात वर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयक आणले आहे, यात शेतकरीविरोधी जाचक अटी असल्याचे आरोप आधीपासून होत आहे, याला देशभरातून विरोध होत आहे, पहिल्यांदा सोशल मिडीयातूनही याला विरोध होताय.

Updated: Apr 19, 2015, 10:49 AM IST
#KisaanVirodhiNarendraModi ट्विटरवर  एल्गार title=

नवी दिल्ली : ट्विटरवरही 'किसान विरोधी नरेंद्र मोदी' हा ट्रेंड सर्वात वर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयक आणले आहे, यात शेतकरीविरोधी जाचक अटी असल्याचे आरोप आधीपासून होत आहे, याला देशभरातून विरोध होत आहे, पहिल्यांदा सोशल मिडीयातूनही याला विरोध होताय.

काँग्रेसने भूसंपादन विधेयकाविरोधात आज दिल्लीतील रामलीला मैदानावर किसान रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असे देशातील विविध राज्यातून शेतकरी सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये चिंतन सुटीवरून परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत. 

या रॅलीपूर्वीच ट्विटरवर 'किसान विरोधी नरेंद्र मोदी' हा ट्रेंड चालवून नागरिकांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली, शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून राहू नये, शेतकऱ्यांची प्रचंड रॅली पाहून सरकारचे डोळे उघडतील, अशा विविध प्रतिक्रिया देत नागरिकांनी ट्विटरवरून आपला रोष व्यक्त केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.