प्रमुख मुद्दे : मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प

मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे मंत्री सदानंद गौडा सादर करत आहेत.  

Updated: Jul 8, 2014, 01:53 PM IST
प्रमुख मुद्दे : मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प  title=

नवी दिल्ली : संसदेत आज मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर झालाय. रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी हा 2014-15 साठी अर्थसंकल्प सादर केलाय. रेल्वे मंत्री हा अर्थसंकल्प सादर करताना संसदेत गोंधळ झाल्यानं दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलाय.    

2014-15 रेल्वे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :- 

  • रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पीएफ 500 वरून वाढवून 800 रूपये
  • 5 जनसाधारण, 27 नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा, 5 प्रिमिअम गाड्या सुरू करणार, 8 पॅसेंजर, 2 MEMU आणि 5 DEMU सेवा, 6 AC गाड्या आणि 11 रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्याची घोषणा
  • मुंबईसाठी येत्या दोन वर्षात 864 लोकल गाड्या
  • फळं आणि भाज्यांसाठी विशेष कोल्ड स्टोरेज सुविधा, दुधासाठी खास वॅगन पुरवणार
  • नवी दिल्ली - पुणे प्रिमिअम एक्सप्रेस
  • निझामुद्दीन - पुणे साप्ताहिक रेल्वे
  • नागपूर-पुणे साप्ताहिक रेल्वे
  • औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण
  • कसारा-इगतपुरी चौथ्या मार्गाचं सर्वेक्षण
  • सोलापूर-तुळजापूर रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण
  • रेल्वेच्या इंधनात 5 टक्के बायोडिझेल वापरणार
  • हायस्पीड ट्रेनला डायमंड कॉरिडोरनं जोडलं जाईल
  • मानवरहित क्रॉसिंगसाठी 1780 करोड रुपयांचा खर्च
  • 10 मोठ्या स्टेशन्सला एअरपोर्टप्रमाणे अद्ययावत सोई उपलब्ध करून दिल्या जातील
  • हायस्पीड ट्रेन : नागपूर-कानपूर, मुंबई-गोवा, दिल्ली-चंदीगड, दिल्ली-आग्रा, नागपूर-सिकंदराबाद, मैसूर-बंगळुरू-चेन्नई
  • इंधनासाठी बायो डिझेलवर भर देणार
  • कॉईन ऑपरेटेड तिकीट मशिन्स
  • रेल्वे स्टेशन्सवर सोलर पॅनल लावणार 
  • कठोर उपाययोजना, सुधारणांवर भर
  • हास स्पीड ट्रेन्स 169 किमी प्रती तास वेगानं धावणार
  • नऊ लाईन्सवर हाय-स्पीड ट्रेन
  • गोवा-मुंबई, नागपूर-सिकंदराबाद हायस्पीड ट्रेल
  • अ दर्जाच्या स्टेशन्सवर वाय-फाय सुविधा
  • गदग - पंढरपूर रेल्वे सुरु करणार 
  • इंजिनिअरींग, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत उन्हाळी इटर्नशिप
  • बुलेट ट्रेन प्रकल्पाला लवकरच करणार सुरुवात
  • मुंबई-अहमदाबादसाठी बुलेट ट्रेनची घोषणा
  • स्वामी विवेकानंद यांच्या प्रीत्यर्थ विशेष रेल्वेची घोषणा
  • 17 हजार पोलीस कॉन्स्टेबल्सची भरती करणार
  • रेल्वे आरक्षण आणखी सुलभ करणार
  • महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या तीर्थयात्रींसाठी नव्या विशेष रेल्वेची घोषणा
  • देशाला बुलेट ट्रेनची गरज
  • जेवणाची ऑर्डर फोनवर किंवा एसएमएसवरही देऊ शकाल
  • 4000 महिला आरपीएफ कॉन्स्टेब्ल्स 
  • प्रवाशांच्या सोईसाठी वर्क स्टेशन्स राहतील
  • साफसफाईसाठी सीसीटीव्हीचीही नजर राहील
  • साफसफाईसाठी सीसीटीव्हीचीही नजर राहील
  • 50 मोठ्या स्टेशन्सवर साफ-सफाईची व्यवस्था एजन्सीकडे देण्याचा प्रस्ताव
  • अपंगांसाठी बॅटरी ऑपरेट कारची सेवा
  • सर्वच रेल्वे प्लॅटफॉर्मवर एस्कलेटरची सुविधा
  • रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणासाठी 18,400 करोडोंचा खर्च
  • PPP मॉडेलवर रेल्वेला करावं लागेल काम 
  • 4 प्रोजेक्ट गेल्या 30 वर्षांपासून धूळ खाताहेत
  • 9 वर्षांत 99 योजनांची घोषणा पण, काम फक्त एका योजनेचं 
  • एफडीआयला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल
  • रेल्वेत एफडीआयला मंजुरी मिळावी - गौडा
  • रेल्वेच्या विकासासाठी खाजगी गुंतवणुकीचा प्रस्ताव
  • रोज 12 हजार 500 ट्रेन धावतात 
  • कमवायला 94 पैसे खर्च करावे लागतात
  • 1 रुपया कमवायला 94 पैसे खर्च करावे लागतात
  • रेल्वे 11,800 करोड रुपये उधार घेणार
  • 2 करोड 30 लाख रेल्वेचे दररोजचे प्रवासी
  • लोकसभेत रेल्वे बजेट सादर
  • भारतीय रेल्वे अर्थव्यवस्थेचा आत्मा
  • जगातील सर्वात मोठी मालवाहू व्यवस्था 
  • संसदेत विरोधकांनी गोंधळ घालू नये - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेस तयार - मोदी
  • सरकारी बंगले भाड्याने देऊ नये - मोदी
  • मोदी सरकारचा आज पहिला रेल्वे अर्थसंकल्प
  • रेल्वे मंत्री सदानंद गौडा मांडतायत रेल्वे अर्थसंकल्प

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.