५० रुपयांची गुंतवणूक, एका रात्रीत झाला करोडपती

मजुरीचे काम करणारा एक युवक एका रात्रीत करोडपती झाला ते ही ५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर!

Updated: Mar 10, 2016, 08:46 AM IST
५० रुपयांची गुंतवणूक, एका रात्रीत झाला करोडपती title=
संग्रहित

तिरुवंतपुरम : मजुरीचे काम करण्यासाठी पश्चिम बंगालमधून केरळमध्ये आलेला एक युवक एका रात्रीत करोडपती झाला ते ही ५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर!

पश्चिम बंगालमधील बधागजनचा २२ वर्षीय मोहिजुल रहमान शेख यांने केरळ सरकारची एक लॉटरी खरेदी ५० रुपयांत केली आणि त्याचे भाग्यच उजळले. त्याला १ कोटी रुपये लागले आहेत, यावर विश्वास बसला नाही. तो खूप घाबरला. त्याने चक्क कोझीकोड येथील पोलीस स्टेशन गाठले. रात्रभर तेथेच राहिला. कारण आपले लॉटरीचे तिकिट चोरीला जाईल या भीतीने त्याने पोलीस स्टेशनमध्ये राहणे पसंत केले. पोलिसांनीही त्याची मागणी मान्य केली.

सकाळी बॅंक सुरु झाली त्यावेळी पोलीस संरक्षणातच तो बॅंकेत गेला. तेथे त्यांने आपले तिकिट जमा केले. त्याआधी आपल्या कुटुंबीयांना लॉटरी लागल्याची बातमी दिली. रहमानने पोलिसांना सांगितले की, माझे दूरचे नातेवाईक येथे मजुरीचे काम करीत आहेत. मी येथे कामासाठी आलो होतो. मी एका वृद्ध व्यक्तीकडून ५० रुपयांचे करुनया लॉटरीचे तिकिट खरेदी केले. दुसऱ्या दिवसशी कळले की, १ कोटी रुपयांचे बक्षिस लागलेय.

रहमानने पोलिसांना सांगितले की, मी माझ्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. ते मला येथे नेयाला येणार आहेत. रहमानला पत्नी आणि १० महिन्यांची मुलगी आहे.