पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केजरीवालांना शाब्दिक चिमटा काढला आहे.
दिल्लीत ते पंतप्रधानांविरोधात बोलतात आणि गोव्यात येऊन माझ्याविरोधात बोलतात, यामुळे त्यांची जीभ वाढली होती, आता तिला छोटं करण्यात आलं आहे, असं पर्रिकर म्हणाले आहेत. जीभेवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या ते सुट्टीवर आहेत. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं वक्तव्यही पर्रिकर यांनी केलं.
पाहा काय म्हणाले मनोहर पर्रिकर
#WATCH Defence minister Manohar Parrikar comments on Delhi CM Arvind Kejriwal's surgery, in Goa (September 17) pic.twitter.com/8H1g234gUl
— ANI (@ANI_news) 18 September 2016