www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्द भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यसभेत विरोधी पक्ष भाजपचे नेते अरुण जेटली यांनी तर `अरविंद केजरीवाल हे बिना हत्याराचे माओवादी` असल्याचं म्हटलंय.
दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या धरणं आंदोलनाची खिल्ली उडवत भाजपनं ही टीका केलीय. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीही केजरीवाल यांना `अराजक` म्हटलंय. यावर, केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर देताना `होय, मी आहे अराजक` असं म्हटलं होतं.
`केजरीवाल यांचं हे आंदोलन म्हणजे निरर्थक नौटंकी` असल्याचं अरुण जेटली यांनी म्हटलंय. `प्रजासत्ताक दिनाला वाचवण्यात आलंय पण यामुळे प्रजासत्ताक मात्र धोक्यात आलंय` असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. `हा नवा पक्ष केवळ आपली प्रतिष्ठाच गमावत नाहीए तर एक जबाबदार सरकार तसंच मतदारांकडून मिळवलेली सहनुभूतीदेखील गमावत आहे` अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, नायब राज्यपालांशी अरविंद केजरीवाल यांनी फोनवर चर्चा केली, त्यानंतर आरोपी पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असल्याचं केजरीवाल यांना सांगण्यात आलं, यावरून अरविंद केजरीवाल यांनी आपलं धरणे आंदोलन मागे घेतलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवस रेलभवनजवळ केलेलं धरणं आंदोलन 'आप'ला भोवणार आहे. कलम १४४ चा भंग केल्याप्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात आप विरूद्ध केस दाखल करण्यात आली आहे. तसंच रेलभवनाजवळ आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांत झालेल्या झटापटीसंदर्भातही केस दाखल करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.