सपा नेत्याच्या घरात पकडलं सेक्स रॅकेट

उत्तर प्रदेशात एका मोठ्या समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या घरात सेक्स रॅकेट पकडलं गेलंय. पोलिसांनी सपा नेत्याच्या घरातून नऊ मुलींसह सहा तरुणांना अटक केली.

Updated: Jul 6, 2015, 06:31 PM IST
सपा नेत्याच्या घरात पकडलं सेक्स रॅकेट title=
फाईल फोटो

कानपूर: उत्तर प्रदेशात एका मोठ्या समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या घरात सेक्स रॅकेट पकडलं गेलंय. पोलिसांनी सपा नेत्याच्या घरातून नऊ मुलींसह सहा तरुणांना अटक केली.

रॅकेटमध्ये सहभागी सहा मुली कोलकाताच्या राहणाऱ्या आहेत. त्यासर्व तिथं सेक्स वर्कर म्हणून काम करत होत्या. त्यांच्याजवळ कोलकाताच्या एका सेक्स वर्कर संस्थेचं कार्डही सापडलं.

सामाजिक कार्याच्या पडद्याआड देहव्यापार

दीपक गुप्ता नावाचा व्यक्ती स्वत:ला सपा नेता म्हणतो. कानपूर ग्रामीण उत्तर प्रदेश उद्योग व्यापार संघटनाचा महामंत्री आणि समर्पण सेवा समिती एनजीओ अध्यक्ष असल्याचं त्यानं सांगितलं. याच ताकदीच्या आड त्यानं आपल्या घरात देहव्यापाराचं धंदा चालवला होता. पोलिसांनी सपा नेत्यासह ९ मुली आणि सहा मुलांना अटक केलीय.

रात्रभर व्यायची पार्टी

पकडल्या गेलेल्या मुला-मुलींची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. तर दीपक गुप्ताच्या घरी पोलिसांना दारूच्या बॉटल्स आणि महागडी सिगारेट सापडली. शेजारील लोकांचं म्हणणं आहे की, दीपकच्या घरात रात्रभर पार्ट्या चालायच्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.