नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी रविवारी शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपुष्टात आला. त्यामुळं न्या. एच. एल. दत्तू हे आजपासून सरन्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील.
न्या. दत्तू यांचा कार्यकाळ २ डिसेंबर २०१५ पर्यंत असेल. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या न्या. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर टू-जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे.
या पदावर नियुक्ती झाल्याचा मला अतिशय आनंद आहे, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती दत्तू यांनी यावेळी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.