नवी दिल्ली : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी www.ncs.gov.in ही वेबसाईट सुरू केलीय. या 'नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल'चं वैशिष्ट्य म्हणजे इथं सरकारी नोकऱ्यांसोबतच खाजगी नोकऱ्यांचाही शोध घेता येईल.
हे सेंट्रलाईज्ड पोर्टल इंटरकनेक्टेड करिअर सेंटर्सच्या वेबशी जोडलं गेलंय. त्यामुळे इथे उमेदवारांना सरकारकडून सर्टिफाईड केलेल्या काऊन्सलर्स आणि मनोवैज्ञानिकांकडून मोफत सल्लेही घेता येणार आहे.
सध्या या वेबपोर्टलवशी १०३१ करिअर सेंटर्स आणि २,०४,०७,५४८ जॉब रिकर्स, १२९ करिअर मार्गदर्शक आणि सल्लागार, १६८४ रजिस्टर्ड एम्प्लॉयर आणि तब्बल ५३ क्षेत्रांतल्या सक्रीय नोकऱ्या या पोर्टलशी जोडल्या गेलेल्या आहेत.
अधिकृत आकड्यांनुसार देशात केवळ ९५६ रोजगार कार्यालय आहेत. यांमध्ये ४,४७,००,००० लोक रजिस्टर्ड आहे. या सर्व कार्यालयांना तसंच नऊ लाख संस्था आणि कंपन्यांना या पोर्टलवर आणणं हा या योजनेचा उद्देश आहे.
या पोर्टलवर मोफत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परंतु याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी नोकरी शोधणाऱ्यांना आपलं आधार कार्ड या पोर्टलवर लिंक करावं लागणार आहे. तसंच पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी कंपन्यांना आणि संघटनांना आपलं सोसायटी किंवा कंपनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॉपी जमा करावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात १०० रोजगार कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी सरकारला संभावित खर्च १९० करोड रुपये येणार आहे. रोजगार कार्यालय यापुढे काऊन्सलिंग सेटर्सचंदेखील काम करणार आहेत.
तर वाट कसली पाहताय... तुम्हीही नोकरीच्या शोधार्थ असाल तर www.ncs.gov.in या वेबसाईटवर जाऊन स्वत:ला रजिस्टर करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.