दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला

 भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे. 

Updated: Sep 30, 2016, 06:41 PM IST
दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला  title=

जम्मू :  भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे. 

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील बेही बाग येथे जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या गस्त घालणाऱ्या जवानांवर संशयीत दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. 

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता ध्यानात घेऊन भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली आणि काही गावे रिकामे केली आहेत. त्याच दरम्यान हा हल्ला झाल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.