श्रीनगर : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिकही जखमी झालाय. श्रीनगरमधील पंथा चौकातील सेमपुरा इथं ही घटना घडली आहे.
सीआरपीएफचे जवान जम्मूहून श्रीनगरला जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुटीवरतावाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून हायअलर्टवर असल्याचं सीआरपीएफच्या जनसंपर्क अधिका-यांनी सांगितलंय. कितीही हल्ले झाली तरी आम्ही आपलं कर्तव्य पार पाडणारच असं त्यांनी म्हटलंय.