जीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.

Updated: Sep 13, 2015, 05:59 PM IST
जीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त  title=

जहानाबाद, बिहार: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.

प्रवीण मांझीची अटक बिहारच्या जहानाबागमध्ये झाली. मिळालेल्या माहितीनुसार प्रवणीनं सुरुवातीच्या चौकशीत सांगितलं,'हा पैसा पाटण्यातील हनुमान नगर इथं सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी खर्च करायचा आहे, म्हणून तो तिथं नेत आहे. मी आपल्या भावांकडून आणि आईकडून पैसे घेतले होते आणि ते घेऊन पाटण्याला जात होतो.'

अधिक वाचा - बिहार विधानसभा एमआयएम लढविणार : ओवेसी

माजी मुख्यमंत्र्यांच्या या मुलाचं नाव यापूर्वी गेल्या वर्षी एका सेक्स स्कँडलमध्ये आलं होतं. मांझी तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मुलाच्या वागणुकीबद्दल बोलतांना म्हटलं होतं, 'माझ्या मुलाच्या या प्रकरणाचा इतका गवगवा का होतोय, तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरस असेल असंही होऊ शकतं. पार्कमध्ये तर खुलेआम मुलं-मुली एकमेकांसोबत पाहिले जातात. '

ऑगस्ट २०१४मध्ये भाजप नेता सुशील मोदींनी पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता. प्रवीण मांझीवर बोधगयाच्या एका हॉटेलमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. नंतर मात्र वडिलांच्या हुद्द्यानं हे प्रकरण दाबलं गेलं. 

अधिक वाचा - बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.