दिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या

दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय. 

Updated: Feb 10, 2015, 08:09 AM IST
दिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या title=

नवी दिल्ली : दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय. 

'अब की बार' दिल्लीत कुणाचं सरकार येणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून स्पष्ट झालाय. आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज विविध एक्झीट पोलनी वर्तवलाय. आपला 35 ते 40 जागा मिळणार असल्याचा अंदाज सर्वच पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरणार आहे. तर काँग्रेसची मात्र वाताहत होणार असल्याचा अंदाज आहे.  

शिवाय, सट्टेबाजारातही 'आप'ला चांगला भाव मिळत असल्याचं स्पष्ट झालंय.  सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

त्यामुळेच, की काय 'आप'चं निवडणूक चिन्ह असलेला आणि एरव्ही ४० रुपयांना मिळणारा 'झाडू' सध्या ६० ते १०० रुपयांना विकला जातोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.