जयपूर : राजस्थान अँटी कप्शन ब्युरोने खाण घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या IAS अधिकारी अशोक सिंघल यांच्या बँकेच्या लॉकरमधून ३ कोटी रूपयांची ज्वेलरी आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केले.
खाण सचिव अशोक सिंघल बंद खाणींना पुन्हा सुरू करण्यासाठी दीड कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ब्युरोचे महानिरीक्षक दिनेश यांनी सांगितले की, सिंघल यांचे पाच बँक लॉकर खोलण्यात आले. त्यात सुमुारे अडीच कोटी रुपये किंमतीचे सोने, चांदी आणि हिरे आणि पाच लाख रुपयांची ज्वेलरी त्यांच्या घरून जप्त करण्यात आली.
तसेच बँक लॉकरमधून एक रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.