अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीला विरोध

 तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हिंदी भाषेचा विद्यापिठातील समावेशाच्या आदेशाला विरोध केला आहे. हिंदी दिवस नुकताच साजरा करण्यात आला त्यानंतर हिंदीचा अभ्यासक्रमातील समावेशावर जयललिता यांनी विरोध दर्शवला आहे.

Updated: Sep 18, 2014, 04:20 PM IST
अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीला विरोध title=

चेन्नई :  तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हिंदी भाषेचा विद्यापिठातील समावेशाच्या आदेशाला विरोध केला आहे. हिंदी दिवस नुकताच साजरा करण्यात आला त्यानंतर हिंदीचा अभ्यासक्रमातील समावेशावर जयललिता यांनी विरोध दर्शवला आहे.

विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये हिंदी भाषेचा समावेश केला जावा, अशा आशयाच्या केंद्र सरकारच्या आदेश आहे, या आदेशाला तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारचे हे पाऊल घटनाविरोधी असल्याचे जयललिता यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर, याआधीच्या यूपीए सरकारच्या काळामध्ये काढलेला आदेश तमिळनाडुसाठी बांधील नसल्याची भूमिकाही जयललिता यांनी व्यक्त केली. 

केंद्र सरकारची हिंदीसंदर्भातील भूमिका आणि दक्षिणात्य राज्ये यांच्यामधील संघर्ष कायमच अत्यंत संवेदनशील मुद्दा राहिला आहे. यासंदर्भातील जयललिता यांच्या या टोकदार भूमिकेने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.