जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्याजवळच्या लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला झालाय. 

Updated: Apr 27, 2017, 08:32 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्याजवळच्या लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात तीन जवान शहीद झालेत. 

पहाटे चारच्या सुमारास पंजगाममध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या छावणीत किमान चार दहशतवादी घुसले आणि त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. 

लष्कराच्या जवानांनी त्यांना प्रत्त्यरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेलेत...तर आणखी दोघांकडून अजूनही गोळीबार सुरु आहे. लष्कराचे जवान अजूनही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. गोळीबार सुरूच असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.