‘जालियनवाला’ भेट : ब्रिटीश पंतप्रधान शरमलेत

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे आज अमृतसरमध्ये आहेत. सुवर्ण मंदिरात माथा टेकल्यानंतर ते थेट जवळच असलेल्या ‘जालियनवाल बाग’मध्ये पोहचले.

Updated: Feb 20, 2013, 01:32 PM IST

www.24taas.com, अमृतसर
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे आज अमृतसरमध्ये आहेत. सुवर्ण मंदिरात माथा टेकल्यानंतर ते थेट जवळच असलेल्या ‘जालियनवाल बाग’मध्ये पोहचले. ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ ही ब्रिटनच्या इतिहासातील अतिशय लज्जास्पद घटना आहे, असं म्हणत त्यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केलीय.
भारतात ब्रिटिशांचं राज्य कार्यकाळात १९१९ साली जनरल डायर याच्या आदेशानंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. यावेळी अत्यंत अरुंद दरवाजा असलेल्या या बागेत उपस्थित असलेल्या भारतीयांवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर गेल्या ९४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच एका ब्रिटीश पंतप्रधानानं जालियनवाला बागेला भेट दिलीय. ‘यावेळी झालेला नरसंहार कदापि विसरता येणार नाही’ असं म्हणत कॅमरून यांनी या घटनेच्या काळ्या आठवणींना उजाळा दिला.

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि उपस्थित हस्तिंनी कॅमरुन यांचं अमृतसर स्वागत केलं. कॅमरुन यांचा दौरा लक्षात घेता शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. महत्त्वाच्या दलांसह सहा जिल्ह्यांतून जवळजवळ तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलंय.