www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पोलीस कोठडीत असलेले किंवा तुरूंगात असलेल्यांना निवडणूक लढवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे कलंकीत नेते आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांचं फावणार आहे.
तुरुंगात असलेल्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा हा एक दिलासा आहे. लोकसभेत संमत करण्यात आलेल्या दुरुस्ती विधेयकाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तुरुंगात असलेल्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. दोषी ठरेपर्यंत हे नेते निवडणूक लढवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयात म्हटले होते, की जो मतदान करण्याच्या स्थितीत नाही, त्याला निवडणूक लढण्याचाही अधिकार मिळू शकत नाही.
या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यानंतर संसदेत एका कायद्यात दुरुस्ती करुन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरविण्यात आला होता. परंतु, आता न्यायालयाने या दुरुस्तीला मंजूरी दिली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.