पाटणा : हा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय आहे, बिहारमध्ये काँटे की टक्कर नव्हती, आम्ही विरोधकांचाही आदर करू, असं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे.
तसेच, आम्ही सोहार्दपूर्ण वातावरण तयार करणार असल्याचंही नितिश यांनी सांगितलं आहे, तसेच बिहारच्या जनतेने जातीय राजकारण नाकारलं असल्याचंही नितिश यांनी म्हटलंय.
बिहारमध्ये जेडीयू आणि मित्र पक्षांना १७९ जागी विजय मिळाला आहे, तर भाजप आणि मित्र पक्षांना ५८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे, अपक्षांना सहा जागा मिळाल्या आहेत. यात महागठबंधन मधील मित्र पक्षांच्या जागा अशा प्रकारे आहेत, जेडीयू (नितिश) 73, आरजेडी (लालू) 80, काँग्रेस (राहुल) २६.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.