पाटणा : एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
हा मोदींचा वैयक्तिक पराभव आहे. ज्या भागात काँग्रेसचा प्रभाव नसेल तिथे मोदी आणि भाजप हरेल असंही असदद्दुीन ओवेसी म्हटले आहे.
पराभवला मोदी जबाबदार - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
नितीश कुमार यांना केलेल्या फोनमध्ये उद्धव यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या पराभवाला जशा सोनिया गांधी जबाबदार होत्या. तशाच बिहारमधील पराभवाला मोदी जबाबदार आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असेही ठाकरे म्हणाले.
भाजपने पराभव स्वीकारला
बिहारमधील निवडणूक निकालांनुसार राज्यात महाआघाडी पुन्हा सत्तेवर येत आहे. भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की विरोधी पक्षाच्या एकतेने आम्हांला पराभूत केले.
मोदींनी केले नितिश यांचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.