आयकर खात्याचे छापे ९० कोटींची रोकड जप्त

 नोटा बंदी केल्यानंतर आयकर खात्याने चेन्नईत आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये सुमारे ९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चेन्नईसह अण्णानगर आणि टी नगर येथे या धाडी टाकण्यात आल्या. 

Updated: Dec 8, 2016, 07:15 PM IST
आयकर खात्याचे छापे ९० कोटींची रोकड जप्त  title=

चेन्नई :  नोटा बंदी केल्यानंतर आयकर खात्याने चेन्नईत आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये सुमारे ९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चेन्नईसह अण्णानगर आणि टी नगर येथे या धाडी टाकण्यात आल्या. 

आयकर खात्याने बिझनेसमन सेकर रेड्डी, श्रीनिवासा रेड्डी, आणि प्रेम यांना ताब्यात घेतले असून सर्वात मोठे मनी एक्सेंज रॅकेट उद्धवस्त केले आहे. 

चेन्नई आणि परिसरात टाकलेल्या धाडीत ९० कोटी रुपये आणि १०० किलो सोने जप्त करण्यात आले. यात ७० कोटीच्या नव्या नोटांचा समावेश आहे.