शनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'

आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.   

Updated: Jul 25, 2014, 08:10 AM IST
शनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न' title=

नवी दिल्ली : आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.   

आयकर विभागानं हे जाहीर करण्यासाठी एक अधिकृत जाहिरातही प्रसिद्ध केलीय. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)नं यासंबंधी एक निर्देश जारी केलाय. आयकर रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.  

‘आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी विशेष व्यवस्था केली गेलीय आणि त्यासाठी अतिरिक्त काऊंटरही सुरु करण्यात आलेत. 26 ते 28 जुलै आणि 30 ते 31 जुलैपर्यंत अतिरिक्त प्राप्ती काऊंटर सुरु करून विशेष व्यवस्था करण्यात आलीय. त्यामुळे करदात्यांना वेळेवर आयकर रिटर्न जमा करण्यासाठी मदत होऊ शकेल’.

पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार आणि पेन्शनर स्थानिक मिंटो रोड स्थित सिव्हिक सेंटरमध्ये सुरु केलेल्या विशेष काऊंटरवर कागदी दस्तावेजांच्या साहाय्यानं आपले रिटर्न दाखल करू शकतात. पाच लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना आपलं रिटर्न केवळ ऑनलाईन स्वरुपात दाखल करावा लागेल. 29 जुलै रोजी मात्र ईद निमित्तानं सुट्टी राहील.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.