भारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च

भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.

Updated: Aug 27, 2015, 09:34 AM IST
भारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च title=

चेन्नई : भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी ४,५२ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल. जीसॅट-६ हा इस्रोनं तयार केलेला २५ वा भूस्थिर संवाद उपग्रह आहे. जीसॅट श्रृंखतला हा १२ वा उपग्रह आहे. 

या उपग्रहाचे आयुर्मान नऊ वर्षे एवढे असून, त्याचे वजन २११७ किलोग्रॅम एवढं आहे. या उपग्रहामध्येच ६ मीटर व्यासाचा एस-बॅंड अनफर्लेबल अँटेना बसविण्यात आलाय. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा अँटेना असल्याची माहिती इस्रोनं दिलीय.

भूस्थिर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इस्रो तिसऱ्यांदा स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा (जीएसएलव्ही) वापर करतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.