पंतप्रधानांचा तो कार्यक्रम होता आयसिसच्या निशाण्यावर

काही दिवसांपूर्वी उज्जैन पॅसेंजर स्फोटामागे असलेल्या आयसिसच्या लखनऊ मॉड्युलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात घातपाताचा कट असल्याचं समोर आलंय.

Updated: Mar 30, 2017, 09:50 PM IST
पंतप्रधानांचा तो कार्यक्रम होता आयसिसच्या निशाण्यावर  title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी उज्जैन पॅसेंजर स्फोटामागे असलेल्या आयसिसच्या लखनऊ मॉड्युलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात घातपाताचा कट असल्याचं समोर आलंय. NIAनं मोहम्मद दानिश आणि अतिफ मुजफ्फर या अतिरेक्यांची चौकशी केली असता ही बाब समोर आलीये.

मागच्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी 17 ऑक्टोबरला लखनऊमध्ये मोदींची सभा झाली होती. यावेळी रामलीला मैदानात बॉम्ब ठेवण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी दानिशनं अनेकदा प्रयत्न केला, मात्र त्याला शेवटपर्यंत रामलीला मैदानात बॉम्ब पेरण्याची संधी मिळाली नसल्याचं NIAच्या अहवालात म्हटलंय. आतिफनं हा बॉम्ब तयार केल्याचीही माहिती आलीये.