लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. मोठे मोठे नेते उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत होते. यातच काल एक धक्कादायक बातमी समोर आली. लखनऊमध्ये १३ तास दहशतवादी आणि एटीएस यांच्यामध्ये चकमक चालली. यामध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं.
ठाकुरगंजमध्ये एका घरात हे दहशतवादी थांबले होते. दहशतवाद्यांना मारल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या सामग्रीमध्ये ८ पिस्तूल, २००० च्या नव्या नोटा सापडल्या आहेत. भोपाल ट्रेन ब्लास्टमध्ये देखील याच दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आयसीस हा आता उत्तर भारतात देखील पोहोचला आहे. भारतातला हा त्यांचा पहिला हल्ला होता. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर अनेक खुलासे आता होऊ लागले आहेत. या घरात हे ४ दहशतवादी राहत होते. त्या घराचा मालक अरबमध्ये राहतो. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांशिवाय आणखी ३ दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडलं आहे.
मारल्या गेलेल्या या दहशतवाद्यांकडे आयसीसचा झेंडा सापडला आहे. पाईप बॉम्ब देखील त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केला आहे.
Visual from the room in Thakurganj where ISIS Khorasan module terrorist had locked himself, #LucknowTerrorOp lasted for nearly 10 hrs pic.twitter.com/B8KqvZhquO
— ANI UP (@ANINewsUP) March 8, 2017