नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमचे नेते असादुद्दीन औवेसी यांनी दावा केला आहे की कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसने त्यांना धमकी दिली आहे.
ते म्हटले की, शैतानी विचारांची संघटना आयसीसला घाबरत नाही. औवेसी यांनी दावा केला आयसीसने मला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली आहे. औवेसी म्हटले की धमकी म्हटले आहे की तू आयसीसला ओळखत नाही, आपलं तोंड बंद ठेव.
औवेसी म्हणाले की आयसीस एक दहशतवादी संघटना आहे. आयसीसकडे जी ताकद आहे, ती अमेरिकेने दिली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजप नेता संगीत सोम यांनाही अशा प्रकारची धमकी आली होती. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. सोम यांचे नाव मुज्जफरपूर दंगली समोर आले होते.