मुंबई : आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. स्ल्टेल्थ रचनेची ही युद्ध नौका मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी समुद्रात दाखल होईल.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत हा जलावतरणाचा सोहळा संपन्न होणार आहे. या युद्धनौकेचं वजन साडे हजार टन असून, गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानच्या कुठल्याही शहरावर सहज मारा करता येईल अशी ब्रम्होस जातीचं क्रूझ क्षेपणास्त्र या नौकेवर तैनात असतील. शिवाय नौकेची रचना स्टेल्थे स्वरुपाची असल्यानं ही युद्धनौका शत्रूच्या रडारवर दिसत नाही. शिवाय शत्रूनं मारलेल्या क्षेपणास्त्रांना चुकवणारी कवच ही विशेष प्रणालीदेखील या युद्धनौकेचं वैशिष्ट्य आहे.