श्रीनगर : पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. जम्मू काश्मिरातील राजोरी सेक्टरमध्ये उशिरा रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोलीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.
अचानक झालेल्या या गोळीबारात ४ भारतीय जवान गंभीरपणे जखमी झाले आहेत. पाकिस्तानक़डून सतत भारतीय जवानांना आणि सीमेलगतच्या गावातील नागरिकांना लक्ष्य केलं जातंय.