मुंबई - दिल्ली विमानाला आग, अनेक प्रवासी जखमी

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला आग लागल्याने अनेक प्रवासी जखणी झालेत. या विमानात 147 प्रवासी प्रवास करीत होते.

Updated: Aug 20, 2014, 07:21 PM IST
मुंबई - दिल्ली विमानाला आग, अनेक प्रवासी जखमी title=

नवी दिल्ली : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला आग लागल्याने अनेक प्रवासी जखणी झालेत. या विमानात 147 प्रवासी प्रवास करीत होते.

मुंबईतून विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डान केल्यानंतर ते दिल्लीला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. दरम्यान, विमानतळावर उतरताना विमानाला आग लागली.

विमानाला लागलेल्या आगीत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र, जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अनेकांना दुखापत झाल्याचे समजते. काहींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, इंडिगोने याबाबत खुलासा करताना विमानाला कोणतीही आग लागली नसल्याचे म्हटले आहे. विमानातून केवळ धूर आला. विमान विमानतळावर उतरल्यानंतर आपत्कालीन खिडकीतून प्रवासांना बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले. याबाबचे फोटो सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरवर पोस्ट करण्यात आली आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.