तेजपूर : चीनच्या सीमारेषेवर भारताचे सुखोई-३० हे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. नियमित सरावासाठी गेलेले हे विमान बेपत्ता झाले आहे.
या विमानात दोन पायलट आहेत, आसामच्या तेजपूरपासून ६० किमी अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला, अशी माहिती हवाई दलातील सुत्रांनी दिली. हवाई दलाकडून कदाचित हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंत हवाई दलाने एकूण सात सुखोई विमाने गमावली आहेत. आता हे आठवं विमान बेपत्ता झालं असल्याचं हवाई दलाकडून सांगण्यात येत आहे. १५ मार्च रोजी राजस्थानच्या बारमेरमधील शिवकार कुडला या गावात सुखोई-३० एमकेआय जेटसला अपघात झाला होता.