कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Updated: Oct 29, 2015, 11:11 AM IST
कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार title=

मुंबई : देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशात पहिली डबल डेकर गाडी ऑक्टोबर २०११ मध्ये झारखंडमधील धनबाद आणि पश्चिम बंगलामधील हावडा दरम्यात धावली. त्यानंतर अन्य मार्गावर डबल डेकर सुरु करण्याचा विचार करण्यात आला. काँग्रेसचे नेते माधवराव सिंधिया यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या शताब्दी जन्मदिवसाचे औचित्य साधून १९८८ मध्ये शताब्दी एक्सप्रेस सुरु केली.

देशातील सर्वात वेगवान गाडी भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान शताब्दी एक्सप्रेस सुरु करण्यात आली. या गाडीचा ताशी वेग १५० किमी आहे.

याआधी सुरु करण्यात आलेल्या काही गाड्या

१. २०१२ मध्ये अहमदाबाद - मुंबई अशी सुपरफास्ट एसी डबल डेकर गाडी सुरु करण्यात आली. या गाडीला प्रवासासाठी सात तास लागतात.

२. हावडा-धनबाद - ही गाडी ऑक्टोबर २०११ मध्ये सुरु करण्यात आली. ही गाडी सुरु करण्यात आल्याने अमेरिका, इंग्लंडनंतर जगातील भारत हा तिसरा देश ठरला. डबल डेकर गाडीला प्रवासासाठी ५ तास लागतात.

३. चेन्नई - बंगळुरु अशी १२ डब्यांची गाडी सुरु करण्यात आली. यातील १० डब्बे ही डबल डेकर होते. ३५८ किमी अंतरासाठी ६ तास लागतात.

४. दिल्ली - जयपूर ही गाडी १७ ऑगस्ट २०१२ ला सुरु करण्यात आली. या गाडीला ४.३० मिनिटे प्रवासासाठी लागतात.

५. फ्लाईंग राणी - ही देशातील सर्वात जुनी गाडी आहे. मुंबई ते सुरत दरम्यान धावली. शनिवार, रविवार या दोन दिवशी ही गाडी सुरु करण्यात आली. १९०६ मध्ये ब्रिटिशांनी सुरु केली. अधूनमधून ही गाडी सुरु असते.

 

India's first double decker Shatabdi Express to run from Mumbai to Goa: All you need to knowThe Railways ministry...

Posted by PMO India : Report Card on Wednesday, 28 October 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.