नवी दिल्ली : आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी पगार देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वात पहिला लागतोय, हे आम्ही सांगत नाही तर नुकतंच झालेलं एक सर्वेक्षण सांगतंय.
प्रोफेशनल सर्व्हिस फर्म 'टावर्स वॉटसन'नं आशियाई देशांत कर्मचारी वर्गाला दिल्या जाणाऱ्या पगारासंबंधी एक सर्व्हेक्षण केलं. यामधून काही धक्कादायक माहिती उघड झालीय. यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंबंधीची भारताची मोठी दुर्बलता उघड झालीय.
भारतात एका नवख्या कर्मचाऱ्याला अॅव्हरेज 24,000 रुपये (400 डॉलर्स) पगार मिळतो. तर दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसारख्यात जागांवर या स्तरावर पगार पाच पटीनं जास्त मिळतो.
सर्व्हेनुसार, भारताचे पदवीधारक युवक आशियाई देशांत पगाराच्या बाबतीत सर्वात खालच्या स्तरावर आहेत.
अनुभवी कर्मचाऱ्यांची परिस्थिती
आयटी आणि बीपीओ सेक्टरमध्ये भारतानं उल्लेखनीय कामगिरी केलीय पण याशिवाय निर्मितीच्या बाबतीतही भारत आणखी चांगली कामगिरी करू शकतो. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतीत देशाची स्थिती थोडी चांगली आहे. पण, यातही इतर देशांच्या तुलनेत भारत मागे पडलाय.
चीनच्या कर्मचाऱ्यांनाही मिळतो डबल पगार
आयटी सेक्टरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही एका इंजिनियरिंग मॅनेजरला भारतात जवळपास 56,530 अमेरिकन डॉलर मिळवतो. पण, अर्थव्यवस्था डबघाईला आली असली तरी चीनमध्ये याच पदावर काम करणारा व्यक्ती भारतातील कर्मचाऱ्यापेक्षा दुप्पट पगार म्हणजेच जवळपास 1,12,070 अमेरिकन डॉलर मिळवतो. तर, सिंगापूरमध्ये याच पदावर काम करणारा व्यक्ती 1,51,168 अमेरिकन डॉलर सॅलरी घेतो.
'मेक इन इंडिया'
भारताच्या 'मेक इन इंडिया' कॅम्पेनमुळे देशात मल्टी नॅशनल कंपन्यांची आपसांतील स्पर्धा वाढीस लागेल. टॉप 11 देशांत पगाराच्या बाबतीत भारताचं स्थान नववं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.