जागतिक अपेक्षांवर भारत फोल : नारायण मूर्ती

जागतिक पातळीवर भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. पण या सर्व अपेक्षांवर भारत खरा उतरू शकत नसल्याची खंत इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 1, 2012, 04:06 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
जागतिक पातळीवर भारताकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. पण या सर्व अपेक्षांवर भारत खरा उतरू शकत नसल्याची खंत इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर सध्याची देशाची आर्थिक परिस्थिती १९९१ पेक्षाही खराब असल्याचं नारायण मूर्ती यांनी म्हटलंय. यासाठी सरकारी उदासीनता कारणीभूत ठरतेयं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. सरकारी पातळीवरच्या निरुत्साहामुळे भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर खालावली असल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात एक सादरीकरण तयार करून ते पंतप्रधान मनमोहनसिंग आणि वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांना देऊनही त्यावर गेली १४ महिने चर्चा किंवा विचार विनिमय झाला नसल्याचं ते म्हणाले. जागतिक बाजारपेठेत पूर्वी तीन वेळा चीनचं नाव घेतल्यावर जागतिक बाजारपेठेत भारताचं एकदा नाव घेतलं जायचं पण सध्या ३० वेळा चायनाचं नाव घेतल्यावर एकदाही भारताचं नाव उच्चारलं जात नाही. यावरून सद्य परिस्थिती किती गंभीर आहे हे भारतीयांनी आणि सरकारनं ओळखावं, असं त्यांचं म्हणण आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली मतं मांडली.