नवी दिल्ली : टीम इंडियाने तामिळनाडूत जोरदार पावसामुळे चेन्नई जलमय झाल्याने चिंता व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा टीम इंडियातील खेळाडूंनी व्यक्त केलेय. दरम्यान, मुरली विजयने म्हटलेय, आता मी माझ्या कुटुंबीयांसमवेश असायला हवे होते.
गेल्या काही दिवसांत कोसळेल्या पावसामुळे चेन्नईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. तर अनेक जण पुराने बाधीत झाले आहेत. अनेकांची घरे उद्धवस्त झालीत. टीम इंडियाचा खेळाडू मुरली विजयने ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत असायला हवे, असे त्यांनी म्हटलेय.
मुंबईचा खेळाडू अजिंक्य रहाणे यांनेही येथील परिस्थितीव चिंता व्यक्त केली आहे. सर्वजण सुरक्षित राहावेत, अशी त्याने प्रार्थना केलेय. रवीचंद्रन अश्विन आणि मुरली विजयचे कुटुंब चेन्नईतील पुरात विस्तापीत झालेय. दोघेही पावसामुळे बळी घेतल्याने दु:खी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.