देशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये!

तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय. 

Updated: Apr 16, 2015, 04:10 PM IST
देशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये! title=

गांधीनगर : तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय. 

या स्मार्ट सिटीत आत्ता आधुनिक अंडरग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑफिसचे दोन ब्लॉक आहेत. सुनियोजित पद्धतीनं बनविल्या जाणाऱ्या या स्मार्ट सिटीमध्ये चमकते टॉवर, नळांमध्ये पिण्यायोग्य पाणी, स्वयंचलित पद्धतीनं कचरा जमा करण्याची सुविधा तसंच कोणत्याही अडथळ्याविना अखंडीत असा वीजपुरवठा असेल. स्मार्ट सिटीमध्ये इतर आधुनिक सुविधाही पुरवण्यात येतील.

वर्ष २०५० पर्यंत शहरातील लोकसंख्या ४० करोडोंनी वाढून ८१.४ करोडवर पोहण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच शहरीकरणाच्या अशी स्थिती आणि समस्या लवकरच चीननंतर आता भारतासमोरही उभी राहण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता २०२२ पर्यंत १०० स्मार्ट सिटी उभारण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं. कन्सल्टंट केपीएमजीच्या अंदाजानुसार, जवळपास ६.२ लाख करोडोंची ही योजना पंतप्रधान मोदींसाठी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने तसंच लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. 

ही महत्त्वकांक्षी योजना गुजरातची राजधानी गांधीनगरच्या जवळच साकार होतेय. गुजरातमध्ये 
उभी राहणारी ही भारतातली पहिली वहिली स्मार्ट सिटी भारताच्या भविष्यसाठी एक मॉडल म्हणून समोर येईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.