मुंबई : तुम्हाला तुमचं कापलेला टॅक्स परत मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच रिटर्न भरावं लागणार आहे.
आयकर विभागाच्या नव्या नियमांनुसार, आयकर रिफंड घेणाऱ्या पाच लाखांहून अधिक किंवा पाच लाखांहून कमी मिळकतीवर रिफंड क्लेम करावा लागेल. यासाठी त्यांनी केवळ ऑनलाईन रिटर्न भरावं लागेल. २२ जून रोजी जाहीर केलेल्या आदेशांनुसार भारत सरकारनं हा नियम १ एप्रिल २०१५ पासून लागू केलाय.
उल्लेखनीय म्हणजे, आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक मिळकत असणाऱ्या करदात्यांसाठीच ऑनलाईन रिटर्न अनिवार्य होतं.
८० हून अधिक वय असणाऱ्या करदात्यांना ई-फायलिंगपासून सूट दिली गेलीय. सोबतच, ज्या व्यक्तिगत आणि संयुक्त कुटुंब (एचयूएफ) करदात्यांना रिफंड घ्यायचं नसेल, त्यांची मिळकत पाच लाखांहून कमी असेल आणि ऑडिटही होत नसेल तर ते आपला रिटर्न ऑनलाईन किंवा मॅन्युअली भरू फाईल करू शकतील. करदात्यांना त्यांचा रिफंड केवळ ९० दिवसांत मिळावा यासाठी ऑनलाईन रिटर्न प्रक्रिया महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातंय.
२०१५-१६ साठी तुम्ही ३१ ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न भरू शकता. रिटर्न भरताना तुम्हाला आधार क्रमांक, पासपोर्ट नंबर, एकूण बँक खात्यांची संख्याही विचारली जाऊ शकते. करदात्यांनी याची माहिती भरावी लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.