खासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.

PTI | Updated: Dec 29, 2015, 04:02 PM IST
खासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.

महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी कामगार मंत्रालयाला साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा करण्याचे सांगितले होते. ते कामगार मंत्रालयाने मान्य केले आहे. शिशुच्जया जन्मानंतर त्याला आईचे दूध किमान सहा महिने मिळणे गरजेचे असते. त्यामुळे मातृत्व रजा वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन रजा वाढविण्यात आले आहे.

कामगार मंत्रालयाने मातृत्व लाभ कायदा १९६१ यात बदल करण्याची गरज आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व रजा गरजेची असते. मातृत्व रजेचा कालावधी ८ महिने किंवा ३२ आठवडे आणण्याचा विचार मांडला गेला. त्यानंतर कामगार मंत्रालयाने साडेसहा महिने प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला.