आधार कार्ड संबंधी रिझर्व्ह बँकेचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार आता आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडणे अनिवार्य असणार नाही.

Updated: Jan 15, 2016, 01:57 PM IST
आधार कार्ड संबंधी रिझर्व्ह बँकेचा महत्वपूर्ण निर्णय title=

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार आता आपला आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडणे अनिवार्य असणार नाही. म्हणजेच आता आधार नंबराशी आपले बँकेचे खाते जोडणे बंधनकारक राहणार नाही. 



सर्वोच्च न्यायालयाच्या ११ ऑगस्ट २०१५ आणि १५ ऑगस्ट २०१५ च्या आधार कार्ड वापराबाबतच्या निर्णयानुसार बँकांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. 





थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत जवळपास ३५-४० सरकारी योजनांची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात वळवली जाते. यासाठी सर्व लोकसंख्येची खाती बँकांत आधारकार्ड क्रमांकाशी जोडण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या होत्या.



त्यामुळे आता नव्या आदेशानुसार आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे की नाही हा पर्याय लाभार्थींकडे असणार आहे.