दूर्ग : छत्तीसगजमधील ग्राहक न्यायालयाने रेल्वेकडून प्रवाशाचा अपमान झाल्याने, दीड लाख रूपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. प्रवासी संडासमध्ये असतांना दार उघडल्याने रेल्वेला ही भरपाई द्यावी लागणार आहे, प्रवाशाचा अपमान झाल्याच्या कारणावरून ही भरपाई आहे.
गुरूदर्शन लांबा हे दिल्लीहून छत्तीसगडच्या दुर्गपर्यंत प्रवास करत होते, हा ए-वन एसी कोच होता. ते जेव्हा संडासात गेले, तेव्हा कुणीतरी येऊन दार उघडलं.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार या अपमानावरून त्यांनी रेल्वे ग्राहक न्यायालयात केस दाखल केली, लांबा यांनी म्हटलंय मी दार बंद केलं होतं, तरी पण ते उघडलं हे रेल्वेचं बेजबाबदारपणे वागणं आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देतांना म्हटलं होतं की, कोचमध्ये आणखी संडासही होते, त्यांचा वापर लांबा यांनी करायला हरकत नव्हती. कोर्टाने हे ऐकल्यानंतर बेकायदेशीरपणे एसी कोचमध्ये प्रवास केला तर मोठा दंड ठोठावला जातो. तरीही यात्रेकरूंना अशी सुविधा का?.
लांबा यांना दीड लाखांची भरपाई देण्यात येणार आहे, तसेच याचिकेचा खर्च म्हणून १० हजार रूपये दिले जाणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.