www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्लीतील गँगरेप प्रकरणाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना केंद्रातील राज्यमंत्री शशी थरूर यांनी बलात्कार तरूणीचे नाव जाहीर करण्याची मागणी केलीय. थरूर यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडल्याने चिड व्यक्त होत आहे.
शशी थरूर यांनी दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणीचे नाव जाहीर करा, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. तरुणीचे नाव जाहीर न करून आपण काय साध्य केले? तिच्या नातेवाइकांचा आक्षेप नसेल तर बलात्कार झालेल्या तरुणीचे नाव जाहीर करण्यात काहीच गैर नाही. संबंधित महिला एक माणूसच असते, असे थरूर ट्विट केलंय.
दरम्यान, काँग्रेसने या प्रकरणात हात झटकले असून, हे थरूर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटलं आहे.विरोधकांनी थरूर यांचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याची टीका केलीय.
भारतीय कायद्यातील कलम २२८ अ नुसार बलात्कार झालेल्या महिलेचे नाव छापता किंवा कोठेही प्रसिद्ध करता येत नाही. दिल्लीतील एका इंग्रजी दैनिकाने सामूहिक बलात्कार झालेल्या दिल्लीतील तरुणीची माहिती प्रसिद्ध केली होती. या माहितीवरून तिची ओळख सहज होणे शक्यू होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी संबंधित दैनिकावर गुन्हा दाखल केलाय.