नवी दिल्ली: देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.
मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर ०.८ टक्क्यांनी वाढला आहे. तर हिंदूंच्या लोकसंख्येचा दर ०.७ टक्क्यांनी घटलाय. २०११ मध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख आणि जैन या सहा धर्मांची जनगणना करण्यात आली होती.
आणखी वाचा - व्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल
यात केवळ मुस्लिमांचा जन्मदर वाढला असून हिंदू, बौद्ध आणि शिखांचा जन्मदर घटल्याचं स्पष्ट झालंय. तर जैन आणि ख्रिश्चनांच्या जन्मदरात फरक पडलेला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.
आणखी वाचा - मुस्लिम व्यक्ती मागतो मुंबईकडे विश्वासाची मिठी!
कोणत्या धर्माची किती लोकसंख्या आहे त्य़ावर एक नजर टाकूयात...
धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर
धर्म | हिंदू | मुस्लीम | ख्रिश्चन | शिख | बौद्ध | जैन | इतर धर्मिय | निधर्मी |
लोकसंख्या | ९६.६३ कोटी | १७.२२ कोटी | २.७८ कोटी | २.०८ कोटी | ८४ लाख | ४५ लाख | ७९ लाख | २९ लाख |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.