अहमदाबाद : आपल्या देशातला सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य कुठलं असेल बरं? महाराष्ट्र असं तुमचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल पण हे साफ चुकीचं आहे... कारण, भारतातला सर्वात मोठ्ठं टॅक्स डिफॉल्टर राज्य आहे आपल्या पंतप्रधान मोदींचं गुजरात राज्य...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतंच देशातील 20 मोठ्या टॅक्स डिफॉल्टर्स असलेल्या नावांचा खुलासा केलाय... यातील तीन जण गुजरातशी निगडीत आहेत.
'नेम अॅन्ड शेम पॉलिसी' अंतर्गत आयकर विभागानं गेल्या वर्षभरात टॅक्स चोरी करणाऱ्या 67 लोकांची नावं सार्वजनिक केलीत. यातील सर्वात जास्त म्हणजेच 24 जण गुजरातमधून आहेत. या सर्वांवर एकूण मिळून 576.8 करोड रुपयांचा कर भरणा बाकी आहे.
तर यातील केवळ टॉपच्या तीन लोकांवर जवळपास 136.38 करोड रुपये कर बाकी आहे. देशातील एकूण 67 लोकांवर 3200 करोड रुपये बाकी आहेत. हा बाकी कर 1980-81 आणि 2013-14 च्या दरम्यानचा आहे.
या लिस्टमध्ये गुजरात नंतर नंबर लागतोय तो महाराष्ट्राचा आणि तेलंगणाचा... इथं 15 डिफॉल्टर्स आहेत.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 10 करोड रुपयांहून अधिक रुपयांचा कर चुकवणाऱ्यांची यादी बनवण्यात आली होती. परंतु, यंदा मात्र ही सीमा 1 करोड रुपयांवर करण्यात आलीय.