हाय अलर्ट! भारतात अमेरिकासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता

अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातल्या विविध विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा दिला गेला आहे.

Updated: Apr 16, 2017, 02:05 PM IST
हाय अलर्ट! भारतात अमेरिकासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता title=

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातल्या विविध विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा दिला गेला आहे.

मुंबईसह देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. देहरादूनमधील जॉली ग्रँट विमानतळावर एका विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी तीन महत्त्वाच्या विमानतळावर सुरक्षा रक्षकांच्या हालचाली दिसू लागल्या.

मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथून विमान हायजॅक करण्याचा दहशतवाद्यांचा प्लान आहे. यासाठी २३ दहशतवाद्यांची टीम बनवली गेली असल्याचं देखील कळतंय. एका महिलेने सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती दिली. ६ जणांना याबाबत बोलत असतांनाचं पाहिल्या असल्याचं या महिलेने म्हटलं आहे.