जयललिता समर्थकांची अपोलो हॉस्पिटलबाहेर गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त

तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

Updated: Dec 4, 2016, 11:35 PM IST
जयललिता समर्थकांची अपोलो हॉस्पिटलबाहेर गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त  title=

चेन्नई : तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर जयललिता दाखल असलेल्या चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून हॉस्पिटलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जयललितांवर सध्या डॉक्टरांची स्पेशल टीम उपचार करत आहे. त्यांना एक्स्ट्रॉकॉर्पोरियल मेब्रेन हार्ट असिस्ट डिव्हाईसवर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान तामीळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईला रवाना झाले आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी विद्यासागर राव यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.