जेएनयू घोषणाबाजीवर काय वाटतं शहिदाच्या पत्नीला ?

जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणावरुन मोठ्याप्रमाणावर राजकारणही सुरु झालं आहे. 

Updated: Feb 26, 2016, 12:57 PM IST
जेएनयू घोषणाबाजीवर काय वाटतं शहिदाच्या पत्नीला ? title=

नागपूर: जेएनयूमध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणावरुन मोठ्याप्रमाणावर राजकारणही सुरु झालं आहे. याच मुद्द्यावरून सियाचीनच्या हिमस्खलनात शहीद झालेल्या हणमंतप्पां यांच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

देशातील काही विद्यापीठांमध्ये दिल्या जाणा-या देशविरोधी घोषणांनी आपण व्यथित झालो, असं हणमंतप्पां यांची पत्नी महादेवी म्हणाली आहे. आपल्याला मुलगा नाही याची अजिबात खंत वाटत नाही. कारण आपल्या मुलीलाच आपण भारतीय सेनेत भरती करणार असल्याचं मनोगत, महादेवी यांनी मांडलं.

हणमंतप्पा यांच्या स्मरणार्थ आणि दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या देशविरोधी घोषणा प्रकरणी, नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.