यापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट'

भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.

Updated: Mar 26, 2016, 04:12 PM IST
यापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट' title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.

हा निर्णय घेण्यामागे एक मोठे गणित असल्याचे समजते. या नव्या निर्णयामुळे २ कोटी अधिक प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणार आहे. तसेच यामुळे रेल्वेला ५२५ कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना हाफ तिकीट मिळते आणि या हाफ तिकीटात त्यांना पू्र्ण जागाही मिळते. पण, आता मात्र हाफ तिकीट घेतल्यास ती जागा मिळणार नाही. त्यासाठी पू्र्ण तिकीट घेणे गरजेचे असणार आहे.

५ वर्षांखालील मुले मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत प्रवास करू शकणार आहेत. आर्थिक वर्ष २०१४-१५ साली २.११ कोटी मुलांनी हाफ तिकीटाचा प्रवास केला होता. आता रेल्वे आरक्षणाचा फॉर्मही बदलणार आहे ज्याद्वारे ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी पूर्ण जागा आरक्षित करता येईल. रेल्वेच्या या निर्णयाची २२ एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाईल.