अहमदाबाद : गुजरातमधील दोन तरुणींनी अपघात रोखण्यासाठी जबरदस्त थ्रीडी आयडिया शोधून काढलेय. त्यांनी एका मार्गावर थ्रीडी झेब्राक्रॉसिंग अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना लढवून रचना केलेय.
अहमदाबाद - मेहसाना मार्गावर सौम्या पांड्या ठक्कर आणि शकुंतला पांड्या या दोघींनी थ्रीडी क्रॉसिंग पेंटिंग केलेय. त्यामुळे गाडी चालकांना चटकन धोक्याचा अर्लट समजतो.
या पेटिंगमुळे रस्त्यावर क्रॉसिंग झटकन नजरेत भरतो आणि गाडीचा वेग कमी करण्यास मदत होते. हीच आयडिया महाराष्ट्रात अवलंबिल्यास अपघाताला नक्कीच आळा बसेल.