जीएसटी कायद्याच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी बैठक

 जीएसटी करप्रमाणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन महत्वाच्या कायद्यांच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी आजपासून जीएसटी कौन्सिलची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे.

Updated: Jan 3, 2017, 01:41 PM IST
जीएसटी कायद्याच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी बैठक title=

नवी दिल्ली : जीएसटी करप्रमाणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन महत्वाच्या कायद्यांच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी आजपासून जीएसटी कौन्सिलची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे.

जीएसटी लागू झाल्यावर उद्योगांच्या कर संकलनावरील नियंत्रण आणि तपासणीबाबतच्या अधिकारांवरून केंद्र आणि राज्य सरकारांचं एकमत झालेलं नाही. आज आणि उद्या होणाऱ्या बैठकीत याच मुद्द्यांवर सामायिक भूमिका तयार करून मसुद्यात बदल करण्यासंदर्भातले निर्णय होतील. त्याचप्रमाणे जीएसटीशी निगडीत असणाऱ्या सहा वेगवेगऴ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशीही अर्थमंत्री अरुण जेटली चर्चा करणार आहेत.  जीएसटी कौन्सिलची ही आठवी बैठक आहे.